WEL-COME To zpschooldevliwani.blogspot.com

Pages

सुस्वा-गतम्

बोधकथा

. दोन  मुलं  आणि दुकानदार

दोन तरुण मुल एका फराळाच्या दुकानात गेले आणि दुकानदाराचे लक्ष दुसरीकडे आहे असे पाहून,
त्यापैकीएकाने एक लाडू चोरला आणि तो दुसऱ्याकडे दिला. त्याने तो आपल्या खिशात लपविला. 
लाडवांच्या ताटातला वरचा लाडू गेलेला पाहून, दुकानदारास या दोघांचा संशय येऊन तो म्हणाला,
देवाची शपथ घेऊन सांगतो की, तुमचा लाडू मजपाशी नाही. ज्याच्या खिशात लाडू होता तो म्हणतो, 
‘मीही शपथ घेऊन सांगतो की,मी काही तुमचा लाडू चोरला नाही. दुकानदार म्हणाला, ‘तुम्हादोघापैकी 
कोणी लाडू चोरला,हे मला सांगता येत नाही, पण तुम्हांपैकीएक असामी चोर असून, तुम्ही दोघेही 
लबाड आहात,‘तुमच्याशिवाय माझा लाडू कोणी चोरला नाही.’ हे ऐकताच, ज्याने लाडूचोरला होता, 
तो म्हणतो, हे मी अगदी खात्रीने सांगतो.’
‘देवाची शपथ घेऊन सांगतो की, तुमचा लाडू मजपाशी नाही.’
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
तात्पर्य - लबाडीने खरे भाषण करण्यात मोठेसे भूषण नाही, कृत्यातही खरेपणा पाहिजे.
=================================================================


  करडू, बोकड आणि लांडगा

                                                      - अनंत दळवी

                एक करडू एका बोकडाबरोबर चरत असता तेथे एका लांडगा आला. करडास बोकडापासून दूर नेऊन मारून खावे, या हेतूने तो त्यास म्हणतो, ‘मुला, तू आपल्या आईस सोडून आलास, हा केवढा मूर्खपणा केलास बरे? तेथे तुला पोटभर दूध प्यावयास मिळाले असते; येथे या रानात तुझे पोट कसे भरणार?तू आपल्या आईकडे जात असलास, तर चल. मी तुझ्या सोबतीस येतो.’करडू म्हणाले, ‘माझ्या जिवास काही अपाय होऊ नये म्हणूनच आईने मला या बोकडाबरोबर पाठविले आहे: आणि तू तर त्याजपासून मला दूर नेऊन मारून खाऊ इच्छितोस, तेव्हा तुम्हा दोघांपैकी मी कोणाचा विश्वास धरावा, हे तूच सांग बरे?’
===================================================================


३. घोडा आणि रानडुक्कर 

                                         - अनंत दळवी


एक तहानलेला घोडा एका ओढयावर पाणी पिण्यास गेला असता, एक रानडुक्कर पाण्यात डुंबत असलेला त्याच्या दृष्टीस पडला. तो रानडुक्कर घोडयास पाणी पिऊ देईना,त्यामुळे त्यादोघांचे भांडण जुंपले.रानडुक्कराची खोड मोडण्याच्या कामी आपणास मदत करण्याविषयी घोडयाने एका माणसास विनंती केली. माणसाने ती विनंत मान्य करून हाती शस्त्रे घेतली व त्या घोडयावर बसून तो डुकरास शासन करण्यास निघाला.ओढयाजवळ गेल्यावर त्याने एक तीर सोडून त्या डुकराचा तात्काळ प्राण घेतला.आपल्या शत्रूचे आपल्या देखत पारिपत्य झालेले पाहून घोडयास मोठा आनंद झाला, त्याने त्या माणसाचे फार आभार मानले व ‘मला आता घरी जाण्यास आज्ञा असावी’ असे तो म्हणाला. परंतु माणसाने त्यास जाऊ दिले नाही. तो म्हणाला, ‘तुझा मला पुष्कळ उपयोग होईल असे वाटते व म्हणूनच मी तुला माझ्या तबेल्यात नेऊन बांधणार.’ हे ऐकताच, क्षुल्लक गोष्टीसाठी आपले स्वातंत्र्य कायमचे गमाविल्याबद्दल घोडयास फार पश्चात्ताप झाला.
===================================================================


४. अविचार

               एका शिकार्‍याने रानात एक कोल्हा पाहिला. तो इतका सुंदर दिसत होता की, त्याचे कातडे आपल्याजवळ असावे अशी त्या शिकार्‍याला इच्छा झाली. त्याने त्या कोल्ह्याचे बीळ शोधून काढले व त्या बिळाच्या तोंडापुढे एक खड्डा खणला. नंतर त्या खड्ड्यात काही वाळलेली झुडपे घातली व त्यावर मोठा मांसाचा तुकडा ठेवला. कोल्हा तो मांसाचा तुकडा पाहून तेथे येईल व खड्ड्यात पडेल असे त्याला वाटले. सर्व तयारीनंतर तो शिकारी एका झाडापाठीमागे लपून बसला. थोडया वेळाने कोल्हा बाहेर आला व समोरच असलेला मांसाचा तुकडा पाहून तो खावा असे त्याला वाटले; पण त्यात काहीतरी कट असावा असे वाटून तो पुन्हा आपल्या बिळात जाऊन बसला. इतक्यात एक वाघ तेथे आला. काही विचार न करता त्याने त्या मांसाच्या तुकड्यावर झडप घातली व तो खड्ड्यात पडला. त्याच्या पडण्याचा आवाज त्या शिकार्‍याने ऐकला व तो 
धावत तेथे गेला.खड्ड्यात कोल्हा पडला असे समजून त्याने खड्ड्यात उडी मारली, तेव्हा वाघाने त्याला फाडून खाल्ले. 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

तात्पर्य :- अविचाराने नेहमी अनर्थ घडत असतात.
===================================================================

५. स्वभाव
       एका अरण्यात एक सिंह राहात होता. त्या अरण्यात तो एकटाच शक्तीशाली असल्यामुळे वाटेल तसा वागत असे व तेच योग्य असे म्हणत असे. एकदा सर्व प्राण्यांना एकत्र बोलावून तो म्हणाला, 'प्रत्येकाने मला आपल्या शक्तीप्रमाणे खाद्य पुरवावं म्हणजे रोज शिकार करण्याचा माझा त्रास वाचेल.' सगळ्यांनी ही गोष्ट मान्य केली. पण हा कर कोणत्या धोरणाने बसवावा याबद्दल निश्चित पद्धति ठरे ना. वाघ उभा राहून म्हणाला, 'मला वाटतं, कोणी किती पाप केलं ते पाहून त्या मानाने त्याच्यावर कराची आकारणी करावी, प्रत्येकाने आपल्या शेजार्‍यावरील कराची आकारणी करावी म्हणजे फसवेगिरीला जागा राहणार नाही.' त्यावर हत्ती लगेच म्हणाला, 'छे, छे, वाघोबाची ही युक्ती निरुपयोगी आहे. त्यामुळे द्वेष, जुलूम वाढतील. माझ्या मते प्रत्येकाचे सद्‌गुणावर कर बसवावा व तो ज्याचा त्यानेच द्यावा. अशा योजनेने सरकारी तिजोरीत पुष्कळ भर पडेल.'
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
तात्पर्य :- आपले दुर्गुण असतील तर ते झाकून ठेवायचे व थोड्याशा सद्‍गुणाचे मोठे प्रदर्शन करायचे 
असा प्रत्येकाचा स्वभाव असतो.
===================================================================

६. अतिरेक नको
एकदा एक राजहंस एका बगळ्यास म्हणाला, 'काय रे तू आधाशी ! पाण्यातला कोणताही प्राणी खायला तू मागेपुढे पहात नाहीस. बरं-वाईट,नासकं हा फरकसुद्धा तुझ्या खादाड जिभेला समजत नाही.माझं पहा, मी फक्त पूर्ण उमललेल्या कमळातले तंतु तेवढे खाईन, दुसरा कसलाही पदार्थ माझ्या घशाखाली जाणार नाही.' त्यावर बगळा म्हणाला, 'माझ्या दृष्टीने असा चोखंदळपणा असणं बरं नव्हे. ज्या वेळी जे मिळेल ते खावं अन् सुखी राहावं. खाण्याचा पदार्थ दिसला की तो खावा हेच शहाणपणाचं. असे म्हणून बगळा उडाला व जवळच्या तलावाकाठी गेला. तेथे कडेला एक मासा दिसला. तेव्हा विचार न 
करता त्याने तो एकदम गिळला, पण आत असलेला गळ घशाला लागून तो जिवास मुकला. राजहंस आपले आवडते खाणे दुसर्‍या कमळे असलेल्या तळ्यात गेला, पण तेथे हंस धरण्यासाठी जाळे लावले होते, त्यात तो सापडला.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
तात्पर्य :- कोणत्याही गोष्टीचा अतिरेक नको.
=================================================================

७. ईश्वराचा शोध
एक म्हातारी आजीबाई होती.ती दररोज शिवणकाम करत असे. नेहमी काहीतरी शिवत असे. म्हातारीचे शिवणकाम चालते,हे सर्वाना माहित होते.एका दिवशी संध्याकाळची वेळ होती.सुर्यमावळला होता.संघीप्रकाश कायम होता. घरातले दिसत नसले तरी अंगणातले मात्र दिसत होते.आणि अंगणभर फिरुन ही आजीबाई काहीतरी शोधत होती.म्हातार्‍या आजीचे काहीतरी हरवले आहे.ते शोधण्याचा ती प्रयत्न करत होती.हे काही लोकांनी पाहिले. ते आजीजवळ आले आणि त्यांनी तिला चारले,आजीबाई तुम्ही या अंगणात काय शोधताय?आजीने त्यांना सांगीतले की, ती शिवणकाम करत होती आणि काम करता करता तिच्या हातून सुई पडली.पडलेली सुई शोधण्याचा ती प्रयत्न करत होती.लोकांनी सुई शोधायला सुरुवात केली.अंगणभर त्यांनी सुई शोधली पण सुई काही सापड्ली नाही. शेवटी थकुन ते आजीबाई जवळ आले आणि सुई नेमकी कुठे पड्ली ते विचारले म्हातारी म्हणाली,सुई घराच्या आतमध्ये पडली होती. परंतू घरात खुप अंधार आहे.अंधारात सुई शोधणे शक्य नाही.म्हणुन मी अंगणात,उजेडात सुई शोधत होती.लोकांनी कपाळावर हात मारुन घेतला.म्हातारीला वेड लागलेअसे म्हणुन तेथून ते लोक निघुन गेले.आम्ही माणसे या म्हातारी प्रमाणेच वागत नाही काय?संतमहात्म्यांनी सांगुन ठेवले.ईश्वर मनुष्याच्या आत आहे.तो मनुष्याच्या हृदयामध्ये बसतो.पण आत शोधणे कठीण.बाहेरअंगणात शोधणे सोपे.म्हणुन मग आम्ही ईश्वराला मंदिर,मस्जिद,चर्च,मध्ये शोधतोय.दगड आणि मुर्तीमध्ये शोधतोय.पण म्हातारीची सुई जर घरात पडली असेल, तर ती अंगणामध्ये सापडू शकत नाही,हे आम्हाला पटकन लक्षात येते.परंतू मानवाला हृदयात राहणारा ईश्वर,मंदिर-मस्जिद-चर्चदगड मुर्तीमध्ये सापडणे शक्य नाही,मानवाला का कळू नये?

=================================================================

८. एक छोटीशी संधी 
एकदा एका मंदिराच्या पुजाऱ्याच्या गावात पूर येतो. लोक गाव सोडून जायला सुरुवात करतात. जेव्हा ते त्याला आपल्याबरोबर यायला सांगतात तेव्हा तो नाकारतो. तो त्यांना सांगतो, कि त्याचा त्याच्या देवावर विश्वास आहे आणि देव त्याचं नक्की रक्षण करेल. पाणी वाढतं आणि अख्खा गाव त्यात वाहून जातो. एक पट्टीचा पोहोणारा माणूस पुजार्याच्या घरा जवळून पोहत जात असतो. तो पुजार्याला पाठीवरून वाहून न्यायची तयारी दाखवतो; पण पुजारी ते नाकारतो. थोड्या वेळाने एक होडी येते; पण तो त्यातही बसत नाही. शेवटी एक हेलिकोप्तर येत आणि त्याच्याकडे शिडी टाकत पण तो तेही नाकारतो. शेवटी पुराचं पाणी वाढतं आणि त्याचं घर बुडतं व तो मरतो. तो पुण्यवान गृहस्थ असल्यामुले सरळ स्वर्गात जातो. देव भेटल्या भेटल्या तो त्याच्याकडे तक्रार करतो, कि त्याचा एवढा भक्त असूनही त्याने त्याला वाचवलं नाही. तेव्हा देव हसून म्हणाला, " मी तुझ्याकडे एक माणूस, एक होडी आणि एक हेलीकोप्तर पाठवलं होतं. तू दिलेल्या संधीचा फायदा घेतला नाहीस." पुजार्याने आपल्या हट्टीपणामुळे  सर्व  संधी गमावल्या होत्या. मित्रानो, तुमच्या आयुष्यात अशा असंख्य संधी येऊन जात असतात पण त्या क्षणाला तुम्हाला त्याची कल्पनाच नसते. एक छोटीशी संधी तुमच्या आयुष्याला एक चांगली कलाटणी देऊ शकते. म्हणून योग्य संधी कधीच हातची जाऊ देऊ नका.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
तात्पर्य :-योग्य संधी कधीच हातची जाऊ देऊ नका.
================================================================

९.  सुंदर अर्थपूर्ण प्रेमळ कथा 

"सांगली जवळील खेड्या मध्ये एक वृद्ध माणूस राहत होता, त्याची इच्छा होती कि घरासमोरील अंगणात बटाट्याची लागवड व्हावी, पण हे खूप कष्टाचे काम आहे, .... आणि दुर्दैवाने त्याचा मुलगा तुरुंगात होता, त्यामुळे हे कसे होणार, असे म्हणून तो आपल्या मुलाला एक पत्र लिहितो,"राजू,तुझ्या स्वर्गवासी आईची इच्छा होती कि आपल्या अंगणात बटाट्याची लागवड व्हावी, पण त्यासाठी सारे आंगण खोदावे लागणार, मी तर थकलो आहे, तू इथे असतास तर मदत झाली असती"दोनच दिवसात त्या वृद्ध माणसाला त्याच्या मुलाकडून पत्र आले," बाबा, कृपया करून तुम्ही आपले आंगण खोदू नका, तिथे मी पिस्तुल व कार्तुस लपविली आहेत"दुसर्या दिवशी सकाळी पूर्ण मुंबई पोलीस सांगली मध्ये दाखल झाली, त्यांनी पूर्ण आंगण खोदले पण त्यांना काहीच मिळाले नाही.लगेच मुलाचे पत्र आले, " बाबा आंगण खोदून झाले, आता तुम्ही बी पेरा व बटाट्याची मोठी बाग आपल्या अंगणात फुलवा" ............
 इथे बसून मी तुमच्यासाठी सर्वोत्तम म्हणजे हेच करू शकतो.

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
तात्पर्य :- मनापासून काहीही करायचे ठरविले तर ते नक्की होते, मग तुम्ही दुसर्या गावी  किंवा परदेशात असूद्यात. 

=================================================================
१०. सिंह, लाडंगा आणि कोल्हा
एकदा वनराज सिंह खूप आजारी पडला. त्याची प्रकृती विचारण्यासाठी सगळे पशू रोज येत असत,पण कोल्हा मात्र येत नसे. कोल्ह्याचे आणि लांडग्याचे शत्रुत्व होते. या गोष्टीचा फायदा घेऊन लांडग्याने सिंहास सांगितले की, 'महाराज, कोल्हा हल्ली आपल्या दरबारात नसतो. त्यावरून तो आपल्या विरुद्ध काही कपट-कारस्थान करत असावा असं मला वाटतं. हे ऐकून सिंहाने ताबडतोब कोल्ह्याला बोलावणे पाठवले व त्याला विचारले, 'काय रे, मी इतका आजारी असूनही तू मला भेटायला आला नाहीस, याचा अर्थ काय ?तेव्हा कोल्ह्याने उत्तर दिले. 'महाराज, मी आपल्याच करता एखादा चांगलासा वैद्य पहात होतो. कालच मला एका मोठ्या वैद्याने सांगितलं की नुकतंच काढलेलं लांडग्याचं कातडं पांघरलं असता, हा रोग बरा होईल.'सिंहाला ते खरे वाटले व त्याने कातड्यासाठी ताबडतोब लांडग्याला ठार मारले.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
तात्पर्य- दुसर्‍याच्या विनाशाची इच्छा करणारे लोक बहुधा स्वतःच नाश पावतात.
 ================================================================

. उंदीर आणि बेडूक
एका उंदराची एका बेडकाशी फार ओळख होती. उंदीर एका घरातील कोठीत राहात होता व बेडकाचे घर एका नदीत होते.एकदा उंदराने बेडकाला आपले घरी जेवावयास बोलाविले होते. पुढे बेडकाने उंदराला आपले घरी बोलाविले. पण नदीतून उंदराला बेडकाचे घरी जाता येईना. कारण उंदराला मुळीच पोहता येत नाही. मग बेडकाने एक तोड काढली. उंदराचे पाय आपले पायास बांधले आणि आपण पोहू लागला. यामुळे उंदीर बुडाला नाही खरा; पण नाका-तोंडात फार पाणी जाऊ लागले आणि निंमे वाटेतच बिचारा उंदीर तडफडून मेला. परंतु उंदराचे पाय बांधले होते आणि बेडूक सारखा पोहत होता. यामुळे तो मेलेला उंदीर तळाशी बुडाला नाही. पण तसाच वर तरंगत होता. हे वरून एका गरुडाने पाहिले. लगेच  गरुडाने खाली झेप टाकली आणि तो उंदरास वर नेऊ लागला. पण बेडकाचे पायही उंदराला बांधलेले होते; यामुळे तोही उंदराबरोबर वर गेला. गरुडाने दोघांनाही घरी नेले आणि खाऊन टाकले. पहा, भलती संगत केली यामुळे असे झाले. बेडूक नदीत राहणारा आणि उंदीर जमिनीवर राहणारा. यामुळे या दोघांची मेजवाणी एका बाजूस राहिली आणि गरुडाची बरीक मेजवानी झाली. 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
 तात्पर्य :-  यासाठी संगत फार विचाराने करावी.

==============================================================
१२. गाढव आणि लांडगा
एकदा एक गाढव रानात भटकत होते. फिरता फिरता त्याच्या पायाला एक काटा बोचला. तो काटा काही त्याला काढता येईना. तेवढ्यात तिकडून एक लांडगा येताना त्याला दिसला. गाढव नम्रपणे त्याला म्हणाले, ‘वैदयबुवा! कृपा करून माझ्या पायातला हा काटा आपण काढून दया.’ लांडग्याने ते ऐकले आणि त्याच्या पायातला काटा काढून दिला. परंतु, त्या दुष्ट गाढवाने लगेच एक लाथ लांडग्याच्या तोंडावर मारली आणि कोलमडून पडलेल्या लांडग्याकडे बघत ते 
मजेने निघून गेले.
तात्पर्य - काही माणसे इतकी कृतघ्न असतात, की ज्यानेआपल्याला संकटातून वाचवले 
त्याच्याशीसुध्दा ते शिष्टपणे वागतात.
==================================================================

No comments:

Post a Comment